कोरोना संकटाच्या काळातही शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिलं जात आहे, असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे.गेल्या महिन्यात किसान क्रेडिट Kisan Credit Card कार्डविषयी माहिती देताना ते पुढे म्हणाले, “चालू आर्थिक वर्षांत 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं टार्गेट आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून 14 लाख कोटींचं कर्ज याआधीच देण्यात आलं आहे अंतर्गत शेतकऱ्याला 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं

किसान क्रेडिट कार्ड kisan credit card म्हणजेच केसीसी ही एक योजना आहे, जिचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसंबंधीच्या कामासाठी आर्थिक मदत करणं हा आहे. केसीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं इ. शेतीच्या कामांसाठी कर्ज दिलं जातं.याशिवाय 2018-19च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पशुपालन (शेळीपालन, मेंढीपालन कुक्कुटपालन इ.) आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचं निश्चित करण्यात आलं

केसीसीसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. यामध्ये स्वत:च्या मालकीची जमीन असणारे, इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो.आता आपण किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय, ते कसं मिळवायचं आणि त्याचा उपयोग काय, याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊ

क्रेडिट कार्ड कसे काढावे याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.